अनिश्चितता – दैनंदिनी – १५ ऑक्टोबर २००९
अनिश्चितता कुणाला हवी असते? कदाचित ती कुणाच्याच अखत्यारित नसते अन म्हणूनच सगळ्यांच्या वाट्याला कोणत्या ना कोणत्या स्वरुपात तिचा भाग येत असतो… बर्याचदा शक्यतांच्या वेगवेगळ्या हिंदोळ्यावर येणारी चाहुल गटांगळ्या खात असते… जर सुखाची चमचम चांदणी असेल तर मनाला बागडायला नभाचे रान अपुरे पडते तेच जर एखाद्या अशुभ घटनेची किणकिण असेल तर मात्र एका टिंबात सारे विश्व डोळ्यातल्या पाण्याबरोबर विरघळताना दिसते.. एखादी अत्तराची शिशी पडून फुटल्यानंतर जसे कुठे थेंब उडतील व कुठे काचा फेकल्या जातील हे कुणाच्याच शक्यतेत नसते तशीच ती विचित्र चाहुल वाटू लागते.. पाय रोवून घट्ट उभ्या असलेल्या खांबाला जमिनीचा एक हादराही डळमळीत करू शकतो तर तिथे मानवाची ती गत काय? मग प्रश्न पडतो की ही अनिश्चितता जगण्याचाच एक भाग आहे का? या अनिश्चिततेला काहीच उत्तर नाही का? अन जर इथे नैराश्य भावनेतून विचार केला की उत्तर येते नाही म्हणून.. अनिश्चितता ही काही केल्या जाणार नाही म्हणजे आगदी सगळे काही नसले तरी मरण्यासाठीची अनिश्चितता ही कायमच असणार आहे अगदी मरेपर्यंत! मग थोडे हलके वाटते की ही अनिश्चितता स्वीकारून का जगू नये… तिच्यामधील ती अनियमितताच जर स्वीकारली तर जगणे किती सहज अन सोपे होऊन जाते… म्हणजे कितीही ठरवले तरी जसे आपण ठरवू तसे काही पुढचे सगळे होणार नाही म्हणजेच आपण जर ठरवत नसू तर मग आपण उगीचच हे असेच का अन हे असेच का नाही याचा अट्टहास करून उगीचच वेळ का दवडायचा? मग शांत व्हायला होते… अन मग कळते की हे प्रश्न तेव्हाच येतात जेव्हा आपण आपल्या नित्य कर्मातून आपले मन नाहक चिंतेमध्ये गुंतवून ठेवतो तेव्हाच.. ना त्या चिंतेने कधी फयदा होतो अन ना आपली सद्य कर्म पूर्ण मनाने होतात.. म्हणजे दुप्पट नुकसान! अन नक्कीच आपल्यासारख्या व्यवसायिक लोकांना हा सौदा तोट्याचा आहे हे सांगायला कोणा गणितज्ञाची गरज नाही पडणार… इथे जो शहणा होतो तो पुढे जाण्यास पात्र ठरतो व जो इथेच कुंथण्यात वेळ दवडतो तो याच क्षणांमध्ये सरपटत राहतो!
कालचा दिवस दिवाळीचा पहिला दिवस होता… उत्साहाचे वातावरण मनात पिंगा घालत होते पण मग मध्येच घरापासून आणखी एक दिवाळी म्हणून थोडी हुरहुर लागली होती… हरणे, जिंकणे याहीपलिकडे जर कोणती भावना असेल तर ती असते लढणे! जोपर्यंत आपण लढत आहोत तोपर्यंत आपण जरी जिंकलेलो नसलो तरी आपण हरलेलोही नसतो हे तेवढेच खरे! हरणे, जिंकणे या निकालाच्या दोन बाजू आहेत अगदी जसे नाण्याचा दोन बाजू असतत तशाच.. अगदी क्षणिक असतात.. जिंकल्यानंतरही लढावे लागतेच.. लढणे तेव्हाही थांबवता येत नाही.. आणि तसेच ते हरल्यानंतरही थांबवता येत नाही… जिंकणे अन हरणे हे कधीच आपल्या हातात नसते पण हातात असते ते म्हणजे लढणे.. कुणास ठाऊक कदाचित या लढण्यातच जिंकण्याचा आनंद लपलेला असावा!


Short and sweet. Truthful, yet touching.
Ajit
ऑक्टोबर 16, 2009 at 6:06 pm
I was reading your articles from last few days. Simply excellent.
I used to think in this way, every thing in terms of success, failure and fighting for everything. The I relaised that actually fighting is not at all required. Sainya kadhich jinkat naste. Raja jinkto. Chaturpana yaat ahe ki na LAdhata Jinkane.
Jinkana tari kay je aplyala hav te Ghadna.[Karche! te aplya hata aste ka??].
I got answer in “Ata Vishwat make deve..” “Ata” ya shabdat sagle ale.
Insecurity/Uncertainnity comes in mind when we think abt future.But actually there is only PRESENT. If we accept PRESENT as it is, we are with that Almighty.
Then we are always winner. Even after death.
I like your articles and poems. keep writing.All the best.
Sorry not able to type Marathi. But I am Pakka marathi.
Milind
ऑक्टोबर 28, 2009 at 3:08 pm