प्रगती : दैनंदिनी – १६, १७, १८, १९ आणि २० ऑक्टोबर २००९
नेहमी प्रश्न पडतो की भारताची प्रगती ही सामान्य माणसांपर्यंत का पोहचत नाही? या प्रश्नाचे कंगोरे खूपच विस्तृत आहेत.. अन आपल्यापैकी बर्याचजणांना त्याची कल्पनाही असेलच… माझ्यामते सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की भारताची प्रगती होतेय असे म्हणण्यापेक्षा Indiaची प्रगती होत आहे असे जास्त उचित अन योग्य ठरेल.. हे सगळ्यांना मान्य आहे.. अन कदाचित यातच आपल्या प्रश्नाचे उत्तरही लपले आहे… Indiaची प्रगती सर्वसामान्यांपर्यंत पोहचायची असेल तर त्यासाठी सर्वसामान्यांना समजेल हे माध्यम हवे.. म्हणजेच काय तर ह्या प्रगतीला सर्वसामान्याला समजेल त्या भाषेतून त्याच्यापर्यंत पोहचवले पाहीजे… भारतामध्ये ग्लोबलायझेशन स्वीकारले गेले पण ते स्वीकारले गेले ते englishमधूनच.. कोणत्याही भारतीय भाषेतून नाही! भारतातील प्रांतवाद बाजूला ठेवून जर विचार करूयात.. जर तेव्हा प्रत्येक गोष्ट ही भारतीय भाषेचा अट्टहास करून स्वीकारली गेली असती तर काय झाले असते? आज डोक्यावरून जाणारे तंत्रज्ञान शेतकर्यांना वा खेडुतांना त्यांच्या भाषेतून कळु शकले असते.. कितीतरी प्रमाणात नोकर्यांचे दालन उघडले गेले असते.. इंग्रजी म्हणजेच सर्वकाही असा ‘गैरसमज’ न पसरता भारतातील भाषांना प्राधान्य मिळाले असते… भले पहिल्यांदा काही प्रोजेक्टस नसते मिळाले पण या अटीवरुन जर प्रोजेक्टस स्वीकारले असते तर नक्कीच कितीतरी हितकारी झाले असते… आज अवघड वाटणारे माहिती तंत्रज्ञान जर मराठीतून वा हिंदीतून सर्वदूर पसरले असते तर… आज कितीतरी जणांना त्याचा सहज सुलभ फायदा घेता आला असता! आधीच्या पिढ्यांना संगणकाची भीती नसती वाटली.. कमी शिकलेल्या लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण नसता झाला.. आज प्रांतीय भाषेच्या शिक्षणाबाबत आलेली उदासीनता कदाचित यामुळेच आहे.. आज मुलांना प्रांतीय भाषा शिकवा असा अट्टहास करणे योग्य आहे पण जर नोकर्या त्यांना इंग्लिशमधून मिळणार असतील तर त्यांचे मन त्यात कसे लागेल? आधी कॉर्पोरेट जगताची भाषा फक्त इंग्लिश न राखता ती भारतीय भाषा केली पाहीजे… इंग्लिश पर्याय म्हणून असेल… भाषांतर करून देखील कितीतरी नोकर्या उपलब्ध झाल्या असत्या…. खेड्यातील लोकांनादेखील त्यांच्या भेषेत नोकर्या मिळू शकल्या असत्या.. शहराची प्रगती खेड्यापर्यंत खर्या अर्थाने पोहचू शकली असती! कोणतेही राष्ट्र प्रगत होते तेव्हा प्रगती ही सर्वसमावेशक असते.. दुर्दैवाने भारतातील प्रगती सर्वसमावेशक न होता समाजातील काही घटकांपर्यंत मर्यादित राहण्यासाठी हे देखील एक मुख्य कारण असू शकते.. नव्हे आहेच! आज भारत लोकशाहीकडून भांडवलशाहीकडे झुकतो आहे.. त्यामुळे हा भाषेचा मुद्दा मांडायचा असेल तर सरकारी प्रयत्न गरजेचे आहेत… कालांतराने या भांडवलदारांनी सरकारी हस्तक्षेप व कायद्याचा बडगादेखील उधळून लावला तर नवल वाटायला नको! या विचित्र धोरणामुळेच भारतातील भाषा जागतिक पातळीवर पिछाडीवर राहील्या व एका अर्थाने भारतीय भाषांची प्रगती खुंटली असेही म्हणता येईल! आज चीन, रशिया, जपान, आखाती देश, युरोपातील छोटी राष्ट्रे भारतापेक्षा प्रगत आहेत कारण तेथील समाजातील प्रत्येक घटक त्यांच्या प्रगतीचा हिस्सेदार आहे.. कोणत्याही तंत्रज्ञानाचे पहिले भाषांतर करून तेथील सामान्य माणसाला कसे समजेल हा कयास तिथे पहिल्यांदा असतो… भारतालाही जर कधी महासत्ता बनायचे असेल तर मात्र सर्वसमावेशक प्रगतीसाठी सर्वसामान्यांना समाविष्ट करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील…. अन भाषेचा हा मुद्दा तेव्हा कळीचा ठरेल यात काही वादच नाही!
शब्दांमध्ये निखारे असतात.. शब्दांमध्ये बंद अण्वस्त्रेही असतात.. फक्त वंदे मातरम हे दोन शब्द कोटी कोटी भारतीयांच्या छातीला ढवळून काढून स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित करू शकतात, हर हर महादेवची गर्जना जर सैनिकांना बेधडक शत्रुवर चालून जाण्यासाठी प्रेरक ठरू शकते… देवाच्या प्रार्थनेचे स्मरणही एकांतात जर अंगावर रोमांच उभारून लढण्यासाठी तयार करू शकते…. सावरकरांचे लेख वाचून कितीतरी तरुण घरदार सोडून जन्मभूमीसाठी प्राण देण्यास तयार होऊ शकतात.. म्हणजेच शब्द काही साधी गोष्ट नाही… शब्दच असतात जे नजरेला भेदून काळजाला छेदू शकतात.. ते शब्दच असतात जे ध्वनीलहरीच्या कंपनामधून अंग-अंग हादरवू शकतात.. शब्दांचे वादळ जर मनाच्या सीमारेषा ओलांडून आत शिरल्यानंतर काय होऊ शकते याची प्रचिती सगळ्यांना आहेच… पण शेवटी त्या शब्दातील भाव समजून घेणेही सगळ्यांना जमत नाही.. रामायण अन महाभारत ऐकून शिवाजी तयार झाले अन तेच रामायण अन महाभारत आज काही तरूणांच्या थट्टेचा विषय बनले आहे… ज्याला भगवदभक्तीच माहीत नाही त्याला शिवशक्ती मिलन कसे समजेल? प्रकृती-पुरुष म्हणजे काय हे कसे कळेल? मूळमाया-परब्रह्म हे नाते कसे उलगडेल? भगवंताशी होणारी अनन्यता, त्यातून पुढे येणारी समाधी कशी समजेल? विवेक, वैराग्य, योग, सिद्धता कसे समजेल? आपल्या पिढीला या गोष्टिंचा पुरवठा कदाचित लहानपणापासून झाला नसेल, याचेही कारण कदाचित इंग्रजाळलेल्या शिक्षणाचे झालेले अंधानुकरणच आहे… त्यामुळे या शब्दांचे खरे अर्थ उलगडण्यासाठी तो ध्यास हवा.. ती आस हवी अन ती भगवंताच्या अढळतेप्रती नितांत श्रद्धा हवी म्हणजे हवीच!
गेल्या चार पाच दिवसांचे वर्णन करण्यास मी असमर्थ आहे, अन कदाचित याचमुळे दैनंदिनी लिहीता आली नसावी.. जेव्हा मनावर मळभ साठते, जेव्हा स्वतःच स्वतःचे शत्रू असतो, विचारांमध्ये भरकटून जेव्हा अज्ञातात हरवणे होते तेव्हा काहीच करता येत नाही.. अशा अवस्थेतून बाहेर येण्यासाठी स्वतःच स्वतःच्या बेड्या तोडाव्या लागतात, स्वतःच निष्ठूर व्हावे लागते.. स्वतःच स्वतःच्या प्रतिमेचा बुरखा फाडावा लागतो…. एका बाजूला दिवाळीचे मंगलमय वातावरण होते.. तर एका बाजूला मौनामधून उठणारे वादळ होते… एका बाजूला नात्यांचा पसारा होता तर एका बाजूला एकांतातील प्रतिध्वनींचा सुळसुळाट…. आम्हा नवरा-बायकोच्या नात्यामधील भरभराट एका बाजूला उज्वल भविष्याकडे झेपावत होती तर एका बाजूला वास्तवाशी जुळवताना रिचवलेले विषाचे प्याले आठवत होते… एखाद्या गोष्टीतून सुटायचे असेल तर फक्त शारीरिक संदर्भ तुटून साध्य काहीच नसते… मानसिक संदर्भ पुसण्यासाठीच खरी इच्छाशक्ती हवी असते.. काही अक्षरे आपल्या जीवनाच्या फळ्यावर न पुसता येणार्या शाईने लिहीलेली असतात.. ती पुसण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यापेक्षा त्यांची जागा तिथेच सोडून नवी अक्षरे काढणे जास्त हितावह ठरते…. कुणास ठाऊक येणारी नवी अक्षरे कदाचित त्या जुन्या अक्षरांचा प्रभाव पुसून टाकतील? पण जुन्या अक्षरात अडकून आपण येणार्या नव्या अक्षरांवर तर अन्याय करत नाही ना हा विचार करणे जास्त योग्य, नाही का?


Chhan lihitos tu mitra. Tuze vichar sudhha agadi jabrdasta ahet. Itkya divsani mala vatata me tula olkhu laglo ahot.
vishal edake
ऑक्टोबर 21, 2009 at 3:36 pm
Yor are absolutely right.But who are going to change this.
“Majya marathichye Bolu Kautuke …” , Yes we are proud of our Mother tounge.
Hi survat Ghara Pasun zali pahijye. Mazya mulala Smartha, Shivaji, Saint Eknatha pasun te Pu la, Va pu, Atre partyant serve samajale pahije. Samarthanchya Vairagyachi Janiv, Shiv charitrachi janiv ani Pu la chi Batatyachi chal jar Aushyat vachli nahi tar Arth kay?? I started teaching him marathi at home.
“Shravanatlya pausache varnan English madhye kasa karna??”
“AAi ya shabdachi Thorvi and madhurya English madhye kasa yenar”
It is actually responsibilty of every individual.
Nice one keep writing.
Milind
ऑक्टोबर 28, 2009 at 3:19 pm
wow nice bolg yaar..
if u dnt mind i use some of ur lines in my orkut aacount..
Thx in advance..
saavi
एप्रिल 1, 2010 at 8:27 सकाळी