दैनंदिनी – १९ ऑगस्ट २००९


एखादे आवडणारे गाणे, त्यातील मिठास, त्याची वेड लावणारी चाल सगळे कसे आपल्यामध्ये विरघळुन एकसंध होऊन जाते, आपल्या गिचमिड आयुष्यात ते गाणे नकळत महत्वाची जागा व्यापुन जाते.. अन आपणही काहीही कुरबुर न करता त्या गाण्याला तेवढी जागा, तेवढे महत्व देऊनही टाकतो! वाटुन जाते, आपले जगणे ही या गाण्याच्या चालीप्रमाणे सुरेल असावे, असेच या काळाच्या गिचमिडीत सहज सामावून जावे अन ‘एक आठवण’ म्हणुन काळाच्या अंतरंगात येणार्‍या अनंत क्षणांमध्ये गुणगुणण्यासाठी अमर होऊन जावे! आपलाही एखादा मल्हार व्हावा, मारवा व्हावा किंवा भैरवी होऊन जावी! सरस्वतीच्या आशीर्वादाने प्रत्येक कंठामधून आपला श्रीगणेशा व्हावा, प्रत्येक रसिक कर्णामधून श्रोत्यांच्या मनावर स्वार व्हावे, कुठे कुणाच्या वेदनेचा हुंकार व्हावे, कुणाच्या एकांताचा शृंगार व्हावे, कुणाच्या हळवेपणाचा आधार व्हावे, कुणाच्या बिनधास्तपणाचा झंकार व्हावे, कुणाच्या सौंदर्याचा अलंकार व्हावे, कुणाच्या रटाळपणात हास्यतुषार व्हावे, कुणाच्या अश्रुंना पुसणारा रुमाल व्हावे….

girl_in_blank_subway_dundasएक एक तासाने येणार्‍या दोन गाड्या जर तासनतास तिष्ठत थांबलेल्या यात्रिकाला एका पाठोपाठ येताना दिसल्या की कसे वाटते, थोडी चीड्चीड होते, थोडेसे हायसे वाटते की आली एकदाची म्हणुन, अन जर या दोन्ही गाड्या न थांबता समोरुन भरधाव निघून गेल्या तर? तो यात्रिक चुकीच्या थांब्यावर थांबला असेल तर? दोन्ही गाड्या इतक्या गच्च भरल्या होत्या की त्यात उभे रहायलाही जागा नव्हती अन म्हणुन न थांबता निघुन गेल्या तर? आजूबाजूला दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसताना पुन्हा अनिश्चिततेच्या झुल्यावर झुलत रहावे लागले तर? अशा परिस्थितीमध्ये आपण कधी ना कधी तरी सापडलेलो असतो… अन यातुन बाहेर येताना झालेली चिडचीड किंवा त्रागा पुन्हा न आठवण्यासाठी किंवा आठवुन आठवुन इतरांना सांगुन आपण त्याचा चोथा केलेला असतो…. तसेच कधी कधी आपण एखाद्या संधीची वाट आयुष्यभर बघत असतो अन अशावेळेला ती आणखी एका संधीच्या हातात हात घालुन समोर येते अन अगदी त्या भरधाव न थांबलेल्या गाड्यांप्रमाणे आपल्यासमोरून निसटुन पसार होते मग अशावेळेला आपण वरील विचार करतो का? की आपण कदाचित चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी आहोत, किंवा बरोबर ठिकाणी चुकीच्या वेळी आहोत किंवा चुकीच्या ठिकाणी बरोबर वेळेला तिष्ठलो आहोत… यातील एकाही शक्यतेच्या जवळपास आपण असू किंवा या निरीक्षणापर्यंत येऊ शकलो तर मग चीडचीड होत नाही अन होणार नाही… अवलोकन, पुनर्लोकन आणि सिंहावलोकन या तीन काड्या नेहमी आपल्या जीवनाच्या काडेपेटीमध्ये असाव्यात जेणेकरून कधीही निराशेच्या अन अपयशाच्या गर्तेत वा अंधारात नाहीसे होण्याची तमा नसेल……

कालचा दिवस सुरु झाला तेव्हा मस्त ताजातवाना होता, अगदी ओल्या कुंकवात बोट बुडवल्याप्रमाणे त्याचा गारवा होता पण नंतर दिवसाचा भार उतरताना तोच ओलावा सुकुन त्याच्या खपल्या निघुन जाव्या त्याप्रमाणे स्मरणातून हळूहळू निघुन गेला… कोणत्याही कामाचा आनंद हा त्या कामातील समर्पणावर ठरतो.. जर एखाद्या कामात, अगदी तद्दन घरगुती कामात सुद्धा एकाग्र होऊन बुडून गेल्यानंतर प्राप्त होणारी निखळ आनंदप्राप्ती ही उल्लेखनीय अशीच असते…

काही योगायोग खुप अनाकलनीय असतात, जसे काल एका ईमेलमधुन काही पेपर कटिंग्स मिळाल्या अन त्यामध्ये काही विषय सुंदररीत्या समजावून सांगितले होते.. अन बरोबर हेच डीट्टो विषय गेल्या एक आठवड्यापासुन माझ्या अन माझ्या पत्नीच्या बोलण्यात सातत्याने होते, त्या विषयाशी निगडीत भगवद्गीतेतील एक अध्यायही याच आठवड्यात रोजच्या वाचनात होता हेही नवलच! अशा घटनांना आपण नक्की योगोयोग म्हणून बाजूला सारू पण मग असेही वाटुन गेले की हे सातत्य नक्किच कोणीतरी या विशिष्ट साखळीत वा शृंखलीत स्वरुपात बांधत असेल अन्यथा हे होणे अशक्य आहे! स्वतःचे कर्तेपण बाजूला ठेवून विचार केल्यानंतर याची शाश्वती वाटते किंवा अगदी मनापासून खात्री पटून जाते.

One Response to दैनंदिनी – १९ ऑगस्ट २००९

 1. Prachi says:

  “अवलोकन, पुनर्लोकन आणि सिंहावलोकन या तीन काड्या नेहमी आपल्या जीवनाच्या काडेपेटीमध्ये असाव्यात जेणेकरून कधीही निराशेच्या अन अपयशाच्या गर्तेत वा अंधारात नाहीसे होण्याची तमा नसेल” faarach awadla he wakya mala….ani tu mhantos tasa yogayog mhanaje aaj maharajanchya (Sadguru Brahmachaitanya Gondavlekar) pravachanat mi hya shrunkhaleshi nigadit sandesh wachla ….tu je gaadyancha warnan kela ahes …ki eka prasangat tya gaadya rataalpane thamblya ahet …dusrya prasangat tya bhardhav nighun gelya ahet….donhi prasangat chidchid hou shakte…pan tu mhantos tasa एकाही शक्यतेच्या जवळपास आपण असू किंवा या निरीक्षणापर्यंत येऊ शकलो तर मग चीडचीड होत नाही अन होणार नाही …mhanje shevti chid chid na hone kivva samadhanat rahane he aplya manasiktewar awalambun ahe ….aajchya pravachanat maharaj mhantaat:

  सुखाचा उगम आपल्यातच आहे. ते जगाकडून मिळत नसते. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्‍न करतो, पण ते त्याला मिळत नाही. याचे कारण असे की, सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते. समजा, आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ; ते बटण दाबल्याबरोबर लागतात. पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटण दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्‍न केला, तरी मूळ ठिकाणीच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही.

  आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून,

  असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय.

  Hi dainandini pathawlyabaddal dhanywad …asech navin navin wachayla milude

  -Prachi

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: