आपली शिक्षणपध्दती? ’गुरुकुल’ नाही नुसतीच ‘cool’! (लेख अन चर्चा)


नेहमी प्रश्न पडतो की आजच्या तरुणपिढीला देशाविषयी किंवा इथल्या संस्कृतीविषयी काहीच अभिमान कसा नाही… ब-याच जणांना संस्कृतीबद्दल बोलणे म्हणजे दोनचार सिनेमात ऐकलेले पाहीलेले दोन तीन संवाद माहीत असतात.. खरी माहिती खुप कमी! याउलट पाश्चिमात्य संस्कृतीचे हर बारकावे माहीत असतात.. तिकडे जाण्याचा एक वेगळा अट्टहास असतो… आपली संस्कृती म्हणजे एक ओझे किंवा जुनाट संकल्पना वाटते.. तीचा पुरस्कार करणे म्हणजे लाजिरवाणे वाटते… व्यक्तिमत्व विकासाची बीजे ही लहानपणापासुन रुजवावी लागतात.. ज्ञानार्जन महत्वाचे असते… मीमांसा महत्वाची असते.. स्वतःची मते तयार होणे गरजेचे असते… पण आज पाहतो ते नुसतेच परीक्षार्जन.. एक जीवघेणी स्पर्धा… व्यक्तिमत्व विकासापेक्षाही एकांगी विकास जास्त दिसतो…

याचे उत्तर शोधले तर कळते की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जेव्हा आपल्याला शिक्षणपध्दती अवलंबायची होती तेव्हा आपण आपली ’गुरुकुल’ पध्दत व त्यातील तत्वे दूर सारून ब्रिटीशांनी सुरु केलेली… पाश्चिमात्य किंवा हेतुपुरस्सर हिंदुस्थानावर लादलेली शिक्षणपध्दती स्वीकारली अन रुजवली.. जीचे ’ब्रिटीशी’ किंवा ’पाश्चिमात्य’ किंवा ’कॉन्व्हेंट’ फळे आता मिळत आहेत….. यातून ब्रिटिशांनी प्रांतिक गुलामीतून मुक्तता देऊन मानसिक गुलामी बहाल केली..

आपली शिक्षणपध्दती खरंच आपली आहे का??? ती खरेच फायद्याची आहे का?? नेहमीच ’पाश्चिमात्य’ हेच एक ’प्रमाण’ मानत राहिल्याने आपला काय फायदा/तोटा झाला?? भारतात आधी गुरुकुल पध्दतीतून कितीतरी गणितज्ञ, शास्त्रज्ञ, विद्वत्ते कसे काय घडले?? भारतात असलेली विविध अवाढव्य मंदिरे, वास्तु ज्या शास्त्राने बांधून आजही तग धरु शकतात ते शास्त्र कालबाह्य कसे काय?? गुरुकुल पध्दतीचे फायदे इथे मांडून चर्चा करण्याची गरज आहे का?

१. मेकॉले हा शिक्षणपध्दती रुजविण्यासाठीचा जनक होता… गेल्या १५० वर्षांपासुन आपण या शिक्षणपध्दतीला अवलंबले आहे अन आज त्याची फळेही आपण उपभोगतो आहोत… मला इथे एवढेच म्हणायचे आहे की.. कदाचित शिक्षणपध्दती बदलणे सद्यपरिस्थितीमध्ये खुप अवघड अन पराकोटीची गोष्ट आहे.. अन हे मानूनच येणा-या पिढ्यांसाठी आपण ’समांतर शिक्षणपध्दती’ किंवा ’पर्यायी शिक्षणपध्दती’ सुरु केली पाहीजे.. जिचा पाया हा पुर्णतः ’गुरुकुलीय’ असेल.. कोणीही सद्य व्यवस्थेमध्ये राहून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा काही तास या पध्दतीमध्ये घालवावे.. अन सुरुवातीला वयोगटाप्रमाणे विचारवर्ग असावे.. अभ्यासक्रम आधी नसावा.. कालांतराने ’समाजमान्यता’ मिळाल्यानंतर तोही रुजवून मूळ शिक्षणपध्दतीमध्ये आणायला हरकत नसावी.. जर आज इंग्रजांना एक पध्दत खोडायला १५० वर्षे लागली तर आपल्याला कदाचित नवी पध्दत रुजवायला २०० वर्षे किंवा जास्त लागतील… पण त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती अन पुरेपूर विश्वास असायला हवा…

२. बलशाली भारताचे स्वप्न सद्य पिढीने नक्कीच सत्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याच बरोबर बलशाली, शक्तिशाली अन स्वाभिमानी अन एकसंध भारताचे स्वप्न खरे करणे हे आजच्या पिढीलाही अवघड आहे.. अन त्याचे मूळ कारण म्हणजे विचारात किंवा विचारपध्दतीत असलेली प्रचंड तफावत… पाश्चिमात्य जगाचे वशीकरण, लादलेला धार्मिक असंतोष, तिस-या महायुध्दाचे सावट, स्वयंपूर्णतेपासून परावलंबतेकडे नेणारे राजकीय धोरण अशा सर्व वातावरणात आपण नव्या पिढ्यांना आमंत्रित करीत आहोत… अन काही अंशी या परीस्थितीला आपल्या आधीच्या अन आपल्या पिढ्या जबाबदार आहेत हे विसरुन चालणार नाही….

अन अशा विषम परीस्थितीमधून तग धरण्यासाठी त्याच तोडीची ही पुढ्ची पिढी तयार करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे.. त्यांना पाश्चिमात्य विचारांच्या आहारी जाण्यासाठी थांबविण्यासाठी त्याच तोडीचा ’देशी’ पर्याय तुम्हाला आम्हाला उभा करावा लागणार आहे अन रुजवावा लागणार आहे.. अन त्यासाठी ’समांतर शिक्षणपध्दती’ गरजेचे आहे असे मला वाटते…

३. या बदलासाठी आपल्यातुनच काही जणांना ही जबाबदारी खांद्यावर घेऊन उभे रहावे लागेल… किंवा आपल्याकडे अजूनही जुने शिक्षक आहेत… वय वर्षे ७०+ त्यांच्याकडुन मार्गदर्शन घेउन नक्कीच त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती म्हणुन ही पध्दती देता येईल…

मी आधीच म्हंटले आहे की आधी फक्त विचारवर्ग असावेत.. तेही अगदी आठवड्यातून काही तास. अन मग समाजमान्यता मिळाल्यानंतर अभ्यासक्रम…. समाजमान्यता मिळाल्यानंतरच HSC अन SSC किंवा ब-याच तांत्रिक गोष्टींवर चर्चासत्र आरंभ करुन मार्ग शोधता येईल…

प्रत्येकाने यापुढे माझ्या मुलाने कसे असावे असा विचार केला अन मतप्रदर्शन केले तर या शिक्षणपध्दतीस वृध्दींगत करण्यास हातभार लागेल… इतिहास अन सध्याचा सामाजिक आवाका लक्षात घेऊन ही पध्दती उभारता येईल…

४. ’अ’ मित्राचे मत –

मला वाटते दादा की, आपल्याकडे “श्रम” प्रतिष्ठा जपणारे शिक्षण देणे गरजेच आहे…., परदेशात मेकॅनिक… फायर फाइटर… ड्राइवर्स ह्यांना ही प्रतिष्ठा असते.. आपल्याकडे मुलगा मेकॅनिक आहे म्हणजे “अनाडी” “जमले नसेल इंजिनियरिंग” “म्हणून केले हात काळे” असे म्हणतात… मला वाटते “आय टी आय” चे एग्ज़िस्टिंग इनफ्रास्ट्रक्चर नीट वापरुन त्याला फोकस केले पाहिजे…. तरच “जगातली सर्वात मोठी वर्किंग” फोर्स जी आपल्या देशाला वरदान आहे, टी नीट यूटिलायिज होईल.. तुमचे काय मत आहे???

५. अगदी बरोबर अन योग्य म्हणणं मांडलंत… आज आपल्याइथे करिअर म्हणजे फक्त इंजिनिअर, डॉक्टर, अन आता आलेल्या काही दोन चार पर्यायानंतर जग संपते अशी व्याख्या आहे… पण आज ही व्याख्या पुसुन टाकणे गरजेचे आहे म्हणजेच आज जर छोटे हॊटेल चालविणे, ईस्त्रीचे दुकान चालविणे, रिक्षा चालविणे आदी हाही व्यवसाय आहे अन त्यातही मूळ तत्वांना पाळण्याचे शिक्षण देण्याची गरज आहे…

अन यासाठीच मूळ तत्वांची रुजवण करणे गरजेचे आहे जे सध्याच्या शिक्षणपध्दतीमध्ये अभावाने दिसते.. सध्या शिक्षणपध्द्ती ही फक्त टॉपरभोवतीच घरंगळते म्हणजे पहिल्या पाचांना हे बक्षिस, किंवा पहिल्या पाचांना हा अभ्यासक्रम… हे नक्कीच उचित आहे.. पण उरलेल्या ९५ जणांचा विचार अजिबात होत नाही.. सगळे १०० जण पहिले येणार नाहीत किंवा पहिल्या पाचात येणार नाहीत हेच सध्याची शिक्षणपध्दती मान्य करत नाही… अन माझा मुद्दा आहे तो लहानपणापासुसून तात्विक शिक्षण देणे… उपलब्ध असलेल्या सगळ्या पर्यांयांना अन त्यातील बारकाव्यांना मुलांना समजेल अशा पध्दतीने समोर मांडून त्यांना विचार करण्यास भाग पाडणे… त्यांना त्यांचा पर्याय स्वतःहून निवडण्यासाठी सक्षम करणे, सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवण्यास शिकवणे.. आज फक्त स्वप्रगतीवर लक्ष देणे एवढेच ध्येय झाले आहे पण सामाजिक दृष्ट्या योगदान असणे विसरलो आहे.. कर भरतो म्हणजे जबाबदारी संपली अशी भुमिका होत चालली आहे.. याची बाल्यावस्थेपासून शिकवण देणे… अन मुळ तत्वांना रुजविणे.. ज्यातुन कदाचित कुणाला राजकारणी, शास्त्रद्न्य़, कुणाला इतिहासकार, कुणाला साहित्यिक, कवी, लेखक, पत्रकार, अभिनेता होणे मनापासुन वाटु लागेल.. अन ते क्षेत्र स्वतःचे म्हणुन मान्य होईल त्यातील तत्वांसहीत.. हल्ली ही ईच्छा विलुप्त होताना दिसते….

उद्याचा भारत म्हणजे आजच्या बालपिढीला संस्कारीत करणे हे महत्वाचे आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे…

६. आज लोकांमध्ये आलेली असुरक्षिततेची भावना या शिक्षणपध्दतीच्या अभाव असणे हेच मुळ आहे… आज आपल्या जिवनक्रमामध्ये स्वतःचा विकास करण्याचे किती पर्याय उपलब्ध आहेत? आपण भगवंताची उपासना करीत नाही ज्याने मानसिक शांती मिळते… त्यामुळे मानसिक दृष्ट्या समाज विकलांग होत आहे… भगवंताच्या उपासनेपेक्षाही सिनेमा, अन फाल्तू मेडियातील ब्रेकींग न्यूजचे व्यसन लागून मानसिक स्वास्थ बिघडवून ठेवले आहे… अन मानसिक स्वास्थ नसेल तर बाकीच्या व्यसनांचा मार्ग मोकळा आहेच!

दुसरे म्हणजे आज आपल्या जिवनक्रमामध्ये बलोपासना आहे का??? काहीच नाही.. व्यायामामुळे आपला शारीरीक विकास होतो.. स्वसुरक्षेची भावना जागी होते.. आत्मविश्वास वाढतो.. हे लक्षात घेत नाही अन मग आम्हाल काठ्या, हत्यारे याची गरज भासू लागते.. स्वतःच एवढे अपंग आहोत की कोणीही हात वर केला की तो आपल्यालाच मारायला केलाय अशी भावना मनात आणुन मग विचित्र पध्दतीने प्रतिक्रिया द्यायची.. हेच सध्या होत आहे….

स्वातंत्र मिळाले म्हणजे आपण सुरक्षित झालो ही चुकीची भावना राजकारण्यांनी वाढीस घातली अन समाजानेही त्यांच्यावर व पोलिसांवर भिस्त ठेवून स्वतःची जबाबदारी विसरली… कायद्याचा वापर पाहीजे तसा राजकारण्यांनी केला अन मग आता समाजानेही त्याचा वापर करायला सुरुवात केली..

समाजात आज कोणीही आदर्श व्यक्तिमत्व उरले नाही… आपल्या पिढीमधुनतरी कुणाचे विचार असे प्रबोधनकारी आहेत असे दिसत नाही.. याला कारणीभूत कुठेतरी आपली जडणघडण आहे.. अन म्हणुनच या ’समांतर शिक्षणपध्दतीचा’ विचार मांडावासा वाटला.. याचा परीणाम व्हायला काही वर्षे(१०-२० किंवा जास्त) जातील पण जे काही परीणाम असतील ते पुरागामी असतील अन आशादायक असतील…

७. ’ब’ मित्राचे मत –
पण आज गरज शारिरिक श्रमाला प्रतिष्टा देण्याची आहे. त्यामुळे बलोपासना ही आपोआपच होइल

८. पहिल्यांदा सुजाण पिढी तयार करण्याची गरज आहे.. जी स्वतःहून हा बदल मान्य करुन पुढे येईल.. आजच्या पिढीला बदलणे अवघड आहे अशक्य बिल्कुल नाही.. कारण त्यांची विचारपध्दती वेगळी आहे… अन त्यासाठी कम्युनीझमचा मार्ग वाढीस लागेल अन त्याचे परीणाम / दुष्परीणाम आपण जाणतोच.. जे अनावश्यक आहे..

आणि बलोपासना ही प्रत्येकाची गरज आहे अन असावी…

आज नीट आठवले तर कळेल की आपल्या आजोबांनी नेहमी बलोपासनेचे महत्व सांगितले पण मग ते आपल्यापर्यंत नाहीसे कसे झाले? कारण या दुसर्‍या शिक्षणपध्दतीने लहानपणापासुनच वेगळी शिकवण दिली ती आपल्या अंगवळणी पडली.. अन आजोबांची शिकवण कालबाह्य वाटली… पण आज पुन्हा त्याची गरज भासू लागली आहे…

९. ’क’ मित्राचे मत –
ग्रामीण शिक्षण व्यवस्थेशी बराच जवळून संबंध असल्याने त्यातील अनागोंदी, फोलपणा किंवा निरर्थकता उघड्या डोळ्यानी बघीतली आहे. ही सर्वात महत्वाची व्यवस्था एवढी ढिसाळ कशी? असा प्रश्न नेहमीच पडायचा. राजकारण्यांनी जाणूनबुजून या घटकाकडे दुर्लक्ष केल्याचं माझं मत आहे कारण लोक अडाणी राहण्यातच त्यांचं भलं आहे हे त्यांना पक्कं ठाऊक आहे.

मात्र पाया कच्चा राहण्याची बरीच कारणे तुमच्या चर्चेमधून समजताहेत. कोणत्याही समस्येवर काम करण्यासाठी समस्येच्या मुळाशी गेले तर उपाय शोधणे सोपे होते. या चर्चेतून बर्याच महत्वाच्या गोष्टी कळताहेत.

सध्या तर ग्रामीण भागातील अगदी दहावी, बारावी झालेल्या मुलांना पण मराठीच व्यवस्थित बोलण्यासाठी क्लासेस घ्यावेत की काय असे प्रकर्षाने वाटतेय. योग्य संभाषण कलाही (मातृभाषेतसुध्दा) शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही यातूनच तीचा फोलपणा स्पष्ट होतो.

१०. ’अ’ मित्राचे मत –
आय टी आय सारख्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थानचे ग्रामीण भागात असणारे चिरंतन महत्व.. तुम्ही नक्कीच पाहून असाल… आजकाल “शेतकी शाळा” पण अनुदान रिचवायचा एक मार्ग म्हणून अस्तित्वात येतात…. काही काही तर कागदोपत्रीच असतात…. विदर्भात तर आमच्या आदिवासी आश्रम शाळा पाड्यांसाठी मागून घ्यायची.. अन् पाडा राहिला बाजूला…. सरळ ती शहरात…. ट्रांस्फर करायची!!!.. आमचे बाबा आमच्या इतल्या 75 वर्षे जुन्या हाइ स्कूल चे निवृत्त मुख्याध्यापक.. त्या मुळे.. डिपार्टमेंट ला “अप्रुवल” चेच कसे पैसे मागतात…. “शालेय पोषण आहार” कोणाचे पोषण करतो.. ही विदारक स्थिती पाहून आहे मी.. अन् ते फार म्हणजे फारच भयानक आहे…

११. ’क’ मित्राचे मत –
इंग्लडमध्ये असताना हे प्रकर्षाने जाणवले आहे. परदेशातील शिक्षण मूल्यांमुळे की काय कल्पना नाही पण समोरची व्यक्ती ही एक माणूस आहे याच जाणीवेतून त्याच्याशी व्यवहार केला जातो. तुम्ही कपडे काय घातली आहेत, तुमच्याकडे पैसे किती आहेत याचा विचार तुमच्याशी बोलताना केला जात नाही. मोठ्या मॅनेजरशी बोलताना जे शिष्टाचार पाळले जातात तेच शिष्टाचार ड्रायव्हर बरोबर बोलतानाही पाळले जातात.
शिक्षणामुळे हा फरक आपल्या इथेही पडू शकेल असा आशावाद मला वेडेपणाचा वाटतो. कारण आपल्याकडे तथाकथीत सुशिक्षीतांचेच वागणेच उलट जास्त मुजोर असते.
आपल्याकडे हा फरक का असावा हे विचार करूनही कळत नाही. आर्थीक विषमतेमुळे अशी परिस्थिती आहे का? शक्यता गृहीत धरायला हरकत नाही पण दुसर्‍या व्यक्तीशी सौजन्याने बोलण्यासाठीही पैसा का असावा लागतो हे कळत नाही.

आपल्याकडे बोली भाषा व पाळण्याचे शिष्टाचार भिन्न असल्याने हा फरक असावा का? उदा. मागे एका सरांनी जसे सांगितले होते की ग्रामीण बोली बोलणार्‍याला शहरामध्ये विचित्र नजरेने बघितले जाते. पण आपल्या भागातील विविधतेमुळे हा फरक तर कायम राहणारच आहे. म्हणूनच मी जे वर म्हणले आहे की शाळांमध्ये मराठी संभाषण कलेचे वर्ग घेणेही महत्वाचे ठरत आहे ते याच अनुषंगाने आहे. बोलताना आपल्या बोली भाषेचा असणारा न्युनगंड जरी दूर झाला तरी ग्रामीण मुलेही आत्मविश्वासाने बोलू, वावरु लागतील. अर्थातच त्यांना मिळणारी दुजाभावाची वागणूक सुधारण्याची शक्यता वाढेल.

तुझे म्हणणे शंभर टक्के खरे आहे. मुळातच प्राथमिक शिक्षणाचाच बट्याबोळ झाला आहे. विदर्भातील आश्रमशाळा म्हणजे काय प्रकार आहे हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. राजकारण्यांची ती मोठी कुरणे झाली आहेत. आदिवासी भागातीलच पोषण आहार नव्हे तर आमच्याही गावातील पोषण आहाराची गोष्ट मी मागे सांगीतली आहेच. असो..

जुन्नर आणी आंबेगाव तालुक्यातील आय.टी.आय. कॉलेजेसला महिंद्रा कंपनीने सर्व फॅसिलीटीज देण्याचे मान्य केले आहे. तेथील इन्फ्रास्ट्रक्चरची काळजी घेण्याच्या मोबल्यात त्यांना येथून प्रशिक्षीत कामगार वर्ग उपलब्ध होईल असा करार आहे. अशा अभिनव कल्पनांचे स्वागत व्हायला हवे आहे. यातून कॉलेजेसचाही दर्जा नक्कीच सुधारण्यास मदत होणार आहे व नोकरीच्या हमीची शक्यताही वाढणार आहे.

निलेश, आपली शिक्षण व्यवस्थेचा दर्जा वाढविण्यासाठी योग्य संभाषण करु शकणारे विद्यार्थी तयार होणे महत्वाचे आहे. त्यात किमान सामाजीक शिष्टाचार पाळण्याचे संकेत असणे हे ओघाने आलेच. आणी हे शिष्टाचार शिकताना आपल्या संस्कृतीची ओळख होण्याची शक्यता वाढते.
पाश्चात्य संस्कृती त्यांच्यासाठी योग्यच आहे पण आपल्यासाठी नव्हे. कारण ती तेथील एकंदरीत आर्थीक, भौतीक, भौगोलीक परिस्थितीनुसार ती बनली आहे. आपल्याकडची परिस्थिती वेगळी असल्याने ती आपल्यासाठी योग्य असेलच असे नाही, हा फरक आपोआपच कळायला सुरुवात होईल.
असे प्रयत्न सुरु व्हायला हवे आहेत हे मात्र खरे आहे.

१२. ’ड’ मित्राचे मत –
भातातात गुरुकुल पद्धत तोपर्यंत येवू शकणार नाही जोवर आपली ओपन इकोनोमी आहे. माझ्या मते तरी इतर सर्व देशांमधे देखील आपल्यासाराखी इंग्रजांनी दाखवलेली शिक्षण पद्धती आहे.

१३. माझ्यामते इकॉनॉमीचा फार कमी संबंध आहे.. आपली सुरुवात ही काही ‘विचारवर्गांनी’ व्हावी.. पूर्णतः नाही…

आधी सुरुवात व्हावी एवढेच मत आहे… कुठेही सध्याची शिक्षणपध्दती मोडीत काढा असे नाही म्हणायचे आहे.. वरती मांडल्याप्रमाणे आपण आपल्याच सदोष शिक्षणपध्दतीचे अनेकानेक तोटे सध्या सहन करीत आहोत अन त्यासाठीच ‘समांतर शिक्षणपध्दती’ रुजविणे गरजेचे आहे.. इथे बर्‍याच जणांनी चांगले मुद्दे मांडले आहेत आणि नक्कीच ते विचार करण्यासारखे आहेत.

कोणतीही पध्दत यायला वेळ अन संघर्ष हा सहाजिकच आहे पण जेव्हा बदल घडतात तेव्हा ते सहजासहजी नाही येत हेही आपण मान्य केले पाहीजे.. पुढच्या पिढ्यांसाठीचे भविष्य हे आताच्या पिढ्यांचे कर्तव्य असते अन ते आपण पार पाडलेच पाहीजे.

इतर देशांना इतिहास किती होता?? आपल्याकडे पूर्ण यशस्वी शिक्षणपध्दतीचा इतिहास आहे अन तो आपण का वापरु नये जेणेकरुन पुढच्या पिढ्या सक्षम होणार असतील… आज UKमध्ये पहीली ‘हिंदू फेथ स्कुल’ सुरु होऊ शकते… अन त्याचा अभ्यास हा पुर्णपणे गुरुकुलीय असणार आहे.. अन अशा बर्‍याच शाळा इथे उघडण्याचा सरकारचा मानस आहे… कदाचित हे ऐकल्यानंतर आपण गोर्‍यांचे अनुकरण म्हणुन तरी हा प्रयत्न करु.. दुर्दैवाने आपण हेच करीत आलो आहोत.. ‘आत्मविश्वास’ हवा!!

१४.  ’इ’ मित्राचे मत –
निलेश खूप छान विषय घेतला चर्चेसाठी. आपली गुरुकुल शिक्षण पद्धती, आजचे शिक्षण हा सगलाच खूप मोठा आणि विस्ताराचा विषय आहे. सगळे संदर्भ या क्षणी माझ्याजवळ नाहीत. पण थोडेफार सांगता येईल. आपल्या देशात फार मोठ्या प्रमाणावर साक्षरता होती. शिक्षणाचा प्रसार होता. ही पद्धत मोडित काढून या देशातील लोकांना नि:सत्व करण्याचा विडा मेकोंलेने उचलला होता आणि तसे त्याने पत्राने कळवलेही होते. (हे पत्र त्याने आपले वडील वा बायको यांना लिहिले होते.) एवढेच नाही तर चांडालान्ना सुद्धा शिक्षण होते. त्या शिक्षणाचे स्वरुप अर्थातच आजच्या शिक्षणापेक्षा वेगले होते. मुलात शिक्षण ही कल्पनाच खूप निराळी व व्यापक होती. १८३६ साली इंग्लॅण्डच्या संसदेत एक विधेयक मांडले गेले त्या विधेयकाचे शीर्षकच `madras pattern of education system’ असे होते. ब्रिटनमधील शिक्षण कसे असावे या संदर्भात ते विधेयक मांडले गेले होते. म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीचे त्यांना आकर्षण निर्माण झाले होते.

१५. ’फ’ मित्राचे मत –
i would like to post some about gurukuls, because i thought the discussion is relevent to the subject matter i m posting there are a few gurukuls that are in existence in India some are dying some are having bright future one is there near my village in sawargaon (in Taluka Ashti, Parbhani District). one is in Umarkhed My cousin is a passout from that place. one is near Mumbai (more near to palghar), in a place called Wada. (this one is really near to just visit it once)
one I know is in Mayapur (Dist. Nadia, West Bengal) one is in Vrindavan there are definitely many in places like Melukote, Udupi, Srirangam, Varanasi, all Shankaracharya Peethas, and so on.

all these are thinly maintained as the economy they run on is choked and their philosophy is teared apart in public by media or by the very educational system that govt is running.
for example, how many of you would like to send their children to gurukul. people are afraid of it as they think what will happen to my child when he will be young? well, they are respectable people after they pass out (My personal experience!)

what do they gain? a lot. not a lot that can be quantified. but as they are living in gurukul

we are our culture. so the things that are taught in these gurukuls are what our culture teaches us, and that is definitely what sanatan dharma is teaching us.

of course they are given “proper schooling” too, side by side, in at least Wada, Mayapur, Vrindavan Gurukuls, (rest: I honestly don’t know, nopes for Sawargaon , umarkhed gurukul)

by some terrible secular people, this ideology is opposed as pro extremist.


there is a rule:

garbage in garbage out.

this was what went in so it came out.

( अधिक संदर्भासाठी – http://www.samanvaya.com/dharampal/

`the beautiful tree’ – By Pro. Dharampal

या पुस्तकात खूप चांगली, उपयुक्त माहिती आहे. आपले जुने समाज जीवन, त्याची विविध क्षेत्रे, इंग्रजांचे कुटील डाव वगैरे त्यात आहे. ब्रिटीश कायद्यानुसार सर्व कागदपत्रे ३० वर्षांनी सगल्यांसाठी खुली करण्यात येतात. प्रो. धर्मपाल यांनी अशाच अधिकृत कागदपत्रांचा अभ्यास केला आहे.)

यावर आपले मत नोंदवा