दैनंदिनी – ०८, ०९, १० आणि ११ ऑक्टोबर २००९‏


चुकीचा इतिहास नक्की काय करू शकतो? याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपली सगळ्यांची बदललेली मानसिकता… परस्त्रीबरोबर उघड उघड संबंध ठेवणार्‍या माणसाला आपण ‘चाचा’ म्हणतो, आयुष्यभर ज्या माणसाने दारूचे अन सिगारेटचे व्यसन जोपासले त्याचा जन्मदिवस आपण ‘बालदिन’ म्हणून साजरा करतो! ज्या माणसाने उघड उघड छत्रपती शिवरायांना ‘दहशतवादी’ म्हंटले त्याच्या नावाने आपण कितीतरी पवित्र स्थानांना नाव देऊन गौरव करतो! ज्या माणसाने आपल्यातील कामभावना जागृत आहे की नाही किंवा आपल्या मनाचा ताबा आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या बाजुला स्त्रियांना नग्नावस्थेत झोपवले त्या माणसाला आपण ‘महात्मा’ म्हणतो! अशा एक ना अनेक गोष्टी आपल्यापासून का लपविल्या गेल्या? याचा जाब आपण कधी आपल्या आधीच्या पिढ्यांना विचारला आहे का? आपल्या येणार्‍या पिढ्यांनी जर हे प्रश्न उपस्थित केले तर आपण काय उत्तर देणार आहोत?

मित्रांनो, खर्‍या इतिहासाचा शोध घ्या…. आपल्या इथे इतिहासाचेही राजकारण करणारे भडवे आहेत… आता तुमच्यासाठी नाही पण येणार्‍या पिढ्यांसाठी तरी बरोबर माहिती जाणून घ्या…. इतिहास कसाही असला तरी तो खर्‍या स्वरुपात माहीत असला पाहीजे.. उगीच कोणाला पाहीजे त्या स्वार्थी उद्देशाने मांडलेला इतिहास म्हणजे शाप आहे… प्रश्न विचारा… उत्तरांसाठी कासावीस व्हा… आता जर हातावर हात ठेवून बसलात तर मात्र खैर नाही… कितीही गुलाबांच्या सज्जामध्ये असलात तरी हा सज्जा भ्रामक आहे याची जाणीव ठेवा… आपल्या आतमध्येही निखारा आहे.. त्यावर विश्वास ठेवा… त्याला संघर्षाची हवा द्या… पेटून उठू देत त्याला अन त्याच्याबरोबर स्वतः पेटून उठा… परकीयांची गुलामी उघड उघड होती ही स्वकीयांकडून होणारी पिळवणुक अदृश्य आहे पण नकळत आपल्या स्वाभिमानाचा गळा घोटत आहे हे लक्षात घ्या! स्वाभिमान असेल तर पुढे या… नसेल तर काळाबरोबर नष्ट होण्यास तयार रहा… भित्र्यांच्या माथी येणार्‍या पिढ्या गद्दारीचा छाप मारतील… तर लढून मरणार्‍यांसाठी क्रांतीचा टिळक माथी लागेल.. इतिहास घडवण्यास सज्ज व्हा… येणारा काळ बदलण्यास सज्ज व्हा!

स्पंदनांची भाषा जेव्हा मनाची भाषा होते तेव्हा एक व्यक्ती बदलतो.. जेव्हा वेगवेगळ्या मनांची भाषा एक होते तेव्हा समाज बदलतो.. प्रत्येक शेवट हा एक नवी सुरुवात घेऊन येतो.. नेहमी शेवटावर रडत बसणार्‍यांस काळ त्याच्या सापळ्यात कैद करतो.. तर शेवटामध्येही संधी शोधून नवी सुरुवात करणार्‍यांच्या उद्देशपूर्तीसाठी काळ कटीबद्ध होतो… आत्मविश्वास प्रत्येकालाच हवा असतो.. आत्मविश्वास जगण्याचा, झगडण्याचा, लढण्याचा, जिंकण्याचा प्रत्येकालाच हवा असतो… पण त्या आत्मविश्वासापर्यंत पोहचविणारा संघर्ष किती जणांना मान्य असतो?

हा संघर्षच सामान्यांना महान ठरवतो वा त्यांना दूर भूतकाळाच्या इतिहासात फेकून देतो… संघर्षाला पर्याय नाही… संघर्षास उभे रहा… स्वतःला या भट्टीत झोकुन द्या.. यज्ञ यशस्वी होण्यासाठी समिधांची आहुती द्यावीच लागते… या समिधा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हा आपला जपलेला पुळचट नेभळटपणा, पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करुन आलेला पंगुपणा होय! आपल्या सदसदविवेकबुद्धीवर साठलेले मळभ आपल्यालाच दूर केले पाहीजे… आता वेड्याप्रमाणे धावणे सोडून थांबून थोडा विचार केलाच पाहीजे… आधी स्वतः बदलून इतर बांधवांपर्यंत ही भावना पोहचवलीच पाहीजे… सुरुवातीला सागर हा एक थेंबच असतो.. तसेच आपणही सुरुवातीला एकटेच असू… आपल्याला आपल्यासारख्यांचा समुद्र गोळा करायचा आहे… दिशाभूल झालेल्यांना योग्य दिशेकडे घेऊन जाण्यासाठी आधी आपले वारू योग्य दिशेला मार्गस्थ केले पाहीजेत… बदलायचे आहे हे मनात ठाम करा! जर सद्य परिस्थितीतून सुवर्णयुग परत आणायचे असेल तर ‘संघर्ष’ करायचाच आहे.. आपली पिढी यासाठी आहुती बनण्यास सज्ज झालीच पाहीजे… उध्वस्त माळरानात एकच महाल बांधून काय फायदा.. सार्‍या माळरानाचे नंदनवन करायला हवे तेव्हाच आणि तेव्हाच त्या महालास खरी शोभा येईल!!

समविचारी लोकांपर्यंत पोहचणे अवघड नाही… पण त्या समविचारी लोकांकडून त्या विचारांची अंमलबजावणी होणे महत्वाची असते.. जेव्हा राजकीय नेतृत्वालाच देशाच्या संस्कृतीचा विसर पडला आहे… जिथे सर्वांगीण विकासापेक्षाही एकांगी विकासाला महत्व देण्यात धन्यता मानली जात आहे… तिथे आपल्या पुढच्या पिढ्या कशा काय समृद्धपणे उभ्या राहतील… हे बदलाचे शिवधनुष्य आपल्या पिढीला पेलावे लागणारच आहे… सुरुवात ही आपल्यापासून आहे अन ती आपल्याला करावीच लागणार आहे.. बदलाची जबाबदारी टाळणे अवघड नाही पण येणार्‍या पिढ्यांचे शाप माथी घेऊन मरणे किती अवघड असेल याचा विचार करा…

शिक्षणाचा खरा अर्थ काय? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे… शिक्षण म्हणजे फक्त वैयक्तिक स्वार्थच असतो का? शिक्षण म्हणजे जिथे उपजलो, जिथे वाढलो तिथल्या लोकांशी प्रतारणा करणे होय का? दोन चारशे रुपये दान करून परिस्थिती सुधारणार आहे का?  विकसित जगाची भुरळ आपल्यावर पडली आहे अन त्यात काहीही गैर नाही… पण ही धुंदी एवढी आहे की आपल्याला आपल्या देशातील वास्तविकतेचा विसर पडला आहे… आपल्या देशाची जगाला भुरळ पडेल असा समृद्ध देश बनवायची मनिषा आपल्या मनात का रुंजी घालत नाही? … सोप्पं नक्कीच नाही पण इथेच ‘खरा संघर्ष’ आहे.. इथे अन इथेच खर्‍या व्यक्तिमत्वाची कसोटी लागणार आहे.. आधीच तयार झालेल्या सकस वातावरणात स्वतःला बदलवून घेणे अवघड नाही… पण असेच सकस वातावरण तयार करणे खरे जिकरीचे आव्हान आहे!

इतर देशात जाउन मी स्वतःला कसे काय तिथल्या संकृतीमध्ये मिळते-जुळते करुन घेतले याची प्रौढी मिरवणारे कितीतरी सहज सापडतील… लोकं यातच खुश होतात.. नवीन देश बघणे यात गैर काहीच नाही.. पण लोकहो, आधी  आपला देश बघा! भारत भ्रमण करा! युवकांमध्ये भारतभ्रमणाविषयी असलेली अनास्थाच आपल्या देशाच्या प्रगतीचे खरे स्वरुप सांगत नाही का? भारत भ्रमण करा .. भारतातील खर्‍या भारताला शोधा… आज भारतातील बहुतांश भाग फिरल्यानंतर मी नक्कीच सांगू शकतो की ते इतके सहज नाही… आयुष्यभरासाठी एक जखम मिळेल.. भळभळती.. कधीही खपली न धरणारी… मित्रांनो ती जखम जगा… ती जखमच तुम्हाला बदलासाठी, संघर्षासाठी परावृत्त करेल!

गेल्या चार दिवसातील मनःस्थिती यावेगळी नव्हती… इथे लंडनमध्ये आपल्या क्रांतीकारकांच्या स्वातंत्र्यपूर्व वास्तव्याच्या जुन्या खुणा शोधण्याचा योग आला… न ऐकलेला व न वाचलेला इतिहास जवळून अनुभवण्याचा योग आला…  सावरकर, मदनलाल धिंग्रा, उधम सिंग, श्यामजी कृष्णवर्मा, लोकमान्य टिळक यांची पदचिन्हे शोधताना अंगावरील रोमांच उभे राहीले.. मन शंभर वर्षापूर्वीच्या काळात हरवून गेले… ब्रिटीशांच्या अघोरीपणाची किळस आली, घृणा वाटली.. आज जगाला ‘शांतता’ शिकवण्यासाठी निघालेल्या या इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराचे थोडुसे वर्णनही यांचे कपटी रुप उघड करते… याचा सविस्तर गोषवारा इथे ब्लॉगवर लवकरच प्रस्तुत करेल… एका बाजुला लंडनमध्ये असताना अशा स्थानांना भेट देता आली यासाठी धन्य वाटत होते तर दुसर्‍या बाजूला आपल्या सरकारचे बेरकी स्वरुप समोर आल्याने चीड आली होती… एक वेगळीच उर्जा नकळतपणे अंगात संचारली… या क्रांतिकारकांच्या साहसाचा एक अंश, एक थेंब आपल्याही वाट्याला यावा, त्यांचे सार्वभौम देशाचे अपूर्ण राहीलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करण्याचे बळ आपल्या अंगी यावे यासाठी मनोमन प्रार्थना करुन या नव्या आठवड्याची सुरुवात केली!

5 Responses to दैनंदिनी – ०८, ०९, १० आणि ११ ऑक्टोबर २००९‏

 1. medhasakpal says:

  ” स्पंदनांची भाषा जेव्हा मनाची भाषा होते तेव्हा एक व्यक्ती बदलतो.. जेव्हा वेगवेगळ्या मनांची भाषा एक होते तेव्हा समाज बदलतो.. प्रत्येक शेवट हा एक नवी सुरुवात घेऊन येतो.. नेहमी शेवटावर रडत बसणार्‍यांस काळ त्याच्या सापळ्यात कैद करतो.. तर शेवटामध्येही संधी शोधून नवी सुरुवात करणार्‍यांच्या उद्देशपूर्तीसाठी काळ कटीबद्ध होतो… आत्मविश्वास प्रत्येकालाच हवा असतो.. आत्मविश्वास जगण्याचा, झगडण्याचा, लढण्याचा, जिंकण्याचा प्रत्येकालाच हवा असतो… पण त्या आत्मविश्वासापर्यंत पोहचविणारा संघर्ष किती जणांना मान्य असतो? हा संघर्षच सामान्यांना महान ठरवतो वा त्यांना दूर भूतकाळाच्या इतिहासात फेकून देतो… संघर्षाला पर्याय नाही… संघर्षास उभे रहा… स्वतःला या भट्टीत झोकून द्या.. यज्ञ यशस्वी होण्यासाठी समिधांची आहुती द्यावीच लागते… या समिधा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हा आपला जपलेला पुळचट नेभळटपणा, पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करुन आलेला पंगुपणा होय! आपल्या सदसदविवेकबुद्धीवर साठलेले मळभ आपल्यालाच दूर केले पाहीजे… ”

  -> एका पाठोपाठ एक प्रभावी विचार… मनातल्या निखा-यांवर फुंकर घालून त्या ठिणग्या पुन्हा प्रकट झाल्या…

  आज असे विचार वाचण्याचीच नाही तर जगण्याची गरज आहे.. हा नेभळटपणा आला आहे तो शिकवल्या गेलेल्या चुकीच्या इतिहासामुळे.. इतिहास का शिकायचा हे तर हल्ली शाळेत सांगितले जात नाहीच, पण इतिहासाच्या नावाखाली जे काही शिकवले जातेय त्याचे परिणाम जर काही झाले असतील तर तो गेल्या २ (आपली अन मागची) पिढ्यांमधे आलेला नेभळटपणा, स्वकेंद्रित वृत्ती… क्रांतिकारकांचे बलिदान आमच्या रक्तात उतरलेच नाही.. आमच्या श्वासातून ती भाषा कधी व्यक्तच झाली नाही.. आमच्या विचारांमधे ती विश्वव्यापी झेप कधी आलीच नाही…
  आता इथून पुढच्या पिढ्यांपर्यंत तरी खरा इतिहास अन त्यामागची खरी भूमिका पोचावी असे तळमळून वाटते.. खुप कमी जणांना शाळेपेक्षा घरी असलेल्या पुस्तकात खरा इतिहास शोधता आला, शिकता आला अन ख-या अर्थाने समजून घेता आला… आता आपण सगळे जण ही स्थिती नक्कीच बदलु शकतो.. आपण असे साहित्य पुढच्या पिढीला देऊ शकतो… अन ’नवी’ पिढी घडवु शकतो..

 2. लेख अगदी रोखटोक आहे,आवडला.अगदी परखड पणे तुमचे विचार मांडले आहेत.
  खरतर मलाही लहानपणा पासून गांधी-नेहरू कधी पटलेच नाही.
  आपल्या क्रांतिकारकानी अखंड हाल अपेष्टा सहन केल्या प्राण गमावले आणी
  हे लोग उगाचच क्रेडिट खातात अस मला वाटते.

  • nileshsakpal says:

   फक्त नेहरु-गांधी तिरस्कार मांडायचा नाही मला…. पण हो, जे खरे आहे ते तितक्याच निरपेक्ष भुमिकेतुन प्रत्येकाने वाचुन आपले मत बनवावे असेच वाटते… फक्त झापडबंद भुमिका किंवा निव्वळ समर्थक म्हणुन वावरणे हीसुद्धा एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे… सारासार बुद्धीतुन आलेली डोळस श्रद्धा असावी असे मला वाटते…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: