“तुतारी”
फेब्रुवारी 21, 2013 यावर आपले मत नोंदवा
वळणांची वाट गरगरणारी,
फिरुनी येते पुन्हा माघारी
नजर वेंधळी घुटमळणारी,
सुरुवातीचे ते कौतुक भारी!
आत डोकवा, येते शिसारी,
घाटाघाटांची गम्मत न्यारी!
कधी झटका, मध्येच उभारी,
चांदण्यानीच थाटली पथारी!
हुंदक्यांची ती भाषा बिलोरी,
काळजांच्या आरपार कट्यारी!
सोबतीचे जाम, आठवांची यारी,
जणू,जिभेवर चिंच विरघळणारी!
मदमस्त कलंदर तो पुकारी,
कोण नाचती नी, कोण मदारी?
कुठले आप हे? कुठले शेजारी,
भाव द्या चेहर्याला, व्हा रंगारी!
झटावे नशिबाने रोजच बाजारी,
म्हणे नशिब तुझे देशील उधारी?
बुरुजावरुनी वाजू द्या तुतारी,
येता आम्ही, कफल्लक भिकारी!
-निलेश सकपाळ, २० फ़ेब्रुवारी, २०१३
प्रतिक्रिया