निर्झर
ऑक्टोबर 21, 2014 यावर आपले मत नोंदवा
निर्झर होता आले नाही,
सल पावसाचे झरताना,
धुमार गंधाचे माळताना,
मेघदुत होता आले नाही
पर्वत होता आले नाही,
सावल्यांशी अडखळताना,
उन्हे कोवळी झेलताना,
प्रकाश होता आले नाही
समुद्र होता आले नाही,
भोवर्यांतुन झगडताना,
वादळांचे भाव शोधताना,
दिपस्तंभ होता आले नाही
उन्मुक्त होता आले नाही,
अद्वैत जंजाळ जखडताना,
संवाद नवे उलगडताना,
शाश्वत होता आले नाही
-निलेश
प्रतिक्रिया