भुमिका मुळांची…..
ऑक्टोबर 21, 2014 यावर आपले मत नोंदवा
झाड वाढताना थोडी ना त्याचे त्याच्या मुळांच्या विस्तारावर लक्ष असते वा नियंत्रण असते… मुळे ही असतातच झाडाच्या स्थिरतेसाठी आणि वाढीसाठी! ..गरजांच्या ध्यासापाठी ती आपल्या कक्षा रुंदावत असतात… कधी एखाद्या अशक्यप्राय मुरबाड जमिनीतुनही कोवळ्या देठापासुन ते फळ, फुल आणि पानांपर्यंत सत्वं पोचवायची अन आपली तगमग अशीच जमिनीमध्ये पुरुन ठेवायची… झाडाची ती आकाशाची सोनेरी स्वप्नं आपण मात्र पाताळात घुसमटुन पुर्णत्वास न्यायची.. ना कसला आकार ना कसले कौतुक… फक्त युगानयुगे, शतकानुशतके अंधारात समाधीस्थ योग्याप्रमाणे व्रतस्थ रहायचं… अवघड आहे माणसाला वा खासकरुन मनाला एका साचेबध्द पठडीत बांधुन आयुष्याच्या अत: पासुन इतिपर्यंत असे असणे… पण बर्याचदा मनही मुळांची भुमिका निभावतेच की.. कधी, केव्हा अन कशी हे मात्र व्यक्तिसापेक्ष आहे!
प्रतिक्रिया