परिचय…
||जय जय रघुवीर समर्थ||
मी निलेश सकपाळ, आणखी एक ब्लॉगर! तुमच्या सारखाच शब्दांपाशी अडलेला, शब्दांभोवती घुटमळणारा, अन शब्दातून शब्दापलिकडे जाण्याचा प्रयत्न करणारा एक ‘शब्दप्रवासी’! तेजाळणार्या सूर्याशी गप्पा मारणारा, रात्रीला थोपटत झोपविणारा, चंद्राला बोटाच्या अग्रभागी घेऊन गोल गोल फिरवणारा, शून्यातून शून्याकडे निघालेला एक शून्यमोल शून्य!
व्यवसायाने अभियंता व त्यातही risk engineeringशी संबंध असल्याने जगण्याचे वेगळे कोन जवळून पहायला मिळतात, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यास मिळतो अन यातुनच बरोबरीला असलेल्या अनुभवाच्या शिदोरीत भर पडत असते. या सर्व अनुभवांना शब्दरुप देता येते वा तो परमेश्वरच माझ्याकडून हे करवून घेत असला पाहिजे, हे सारे लिखाण त्याच्याच चरणी समर्पित!
निलेश सर, खुपच छान ब्लाँग आहे.विशेष मला या “परिचय” ची शब्दरचना खुपच आवडली.
khup chaan vatle vachun karan te anubhavle
Thanks santosh
खरच खूप सुंदर आहे ब्लोग ……..