दैनंदिनी – १४, १५ आणि १६ सप्टेंबर २००९


रस्त्यावर कुठेतरी अकस्मात फुलणार्‍या फुलाचे भविष्य जेवढे अनाकलनीय असते तेवढेच मनात उठणार्‍या वेगवेगळ्या भावतरंगांच्या सूक्ष्म अस्तित्वाचा पुढील अंदाज वर्तवणे अनाकलनीय असते…  एखाद्या लाटेवर स्वार असणे पुर्ण मान्य आहे पण ती लाट ओसरली तर काय करायचे हे आधी ठरवायला नको का? उडणार्‍या पाखरालाही शेवटी जमिनीवरच घरटे बांधावे लागते… एखाद्या धुंदीत हरवून जाणे सगळ्यांना माहीत असते.. कुणाला यशाची, कुणाला दुःखाची, कुणाला व्यसनाची तर कुणाला आणखी कशा-कशाची धुंदी येऊन जगाचा विसर पडतो हे ज्याचे त्यालाच ठाऊक… तरुणपणाचे उसळते तारुण्य नुसतेच निष्क्रीयतेच्या डोंगरावर अभिषेक करवून घालायचे की आयुष्यात काहीतरी करायचे हेच कळत नाही कित्येकांना.. विज्ञानानुसार एक बिंदू दुसर्‍या बिंदुकडे हजारवेळा जाऊन जर पूर्ववत त्याच ठिकाणी येऊन थांबला तर त्याचे विस्थापन ‘शून्य’ असते! आपल्यापैकी कित्येकांचे हेच नाही का होत… ‘मी, घर, नोकरी, मुले-बाळे अन मी’ एवढाच आयुष्याचा फेरफटका होतो व शेवटी वृद्धपणी ‘मी’वर येऊन थांबणे होते.. म्हणजेच काय तर विस्थापन ‘शून्य’! जोपर्यंत विचारांचे वारू चौफेर फिरत नाहीत, कष्टाचे नगारे वाजत नाहीत, निश्चयाचा शंख निनादत नाही, सदविचार-कुविचार यांचे घमासान होत नाही, स्वतःमधुन ‘सृजना’ची निर्मिती होत नाही, जगामध्ये विजयी पताका घेऊन फिरण्याआधी जोपर्यंत आपल्या आतमधील चेतनाशक्तीच्या स्त्रोताची ओळख होत नाही तोपर्यंत सारे व्यर्थ! तरुणपिढीतल्या लोकांना हे सारे थोतांड वाटते अन बरोबर आहे कारण ज्याची ओळखच नाही त्याबद्दल अजून आपण बोलणार तरी काय? दृष्टीकोनामध्ये आलेला हा फरक आता आपल्या प्राचीन संस्कृतीच्या मुळावर उठला आहे.. काही माहिती करुन घेण्याआधीच कुपमंडुकता डोके वर काढते.. आता तरी आपण मान्य करायला हवेच की ज्या गोष्टी आपल्या माहीत नाहीत त्या जगामध्ये होत्या, आहेत अन असतात! अशक्यतेच्या डोंगराला पाहुन घाबरण्यापेक्षा त्याला फोडायला तयार व्हायला हवे, डोंगरालाही फोडुन बोगदा करता येतो, किंवा त्याला वळसा घालून पुढे जाता येते हे अंगी बाणले पाहीजे!

लाकडाची मोळी कितीही करकचून बांधली वा कितीही दोन फळकटं एकत्र चिकटवली तरीसुद्धा झाडावर असताना त्या लाकडांमधील ऋणानुबंध आपण पुन्हा नाही निर्माण करु शकत… एकाच झाडावर दोन भिन्न भिन्न जागी येणार्‍या व एकमेकांबरोबर नसलेल्या दोन फळांमध्ये असणारे नाते परडीमध्ये वा केलेल्या सरबतामध्ये पुन्हा तग नाही धरु शकत… बस्स, असेच काहीसे आपल्याबाबतीत आहे जोपर्यंत आपण काही करु शकतो किंवा काही करण्यासारखे आहोत तेव्हा संधी वाया दवडण्यासारखे दुर्दैव नाही.. जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडण्यास आपण सज्ज झालेच पाहीजे.. आपल्या सदविचारांची मोळी बांधण्याआधी वा आपल्या सदविचारांच्या फळांचा सरबत होण्याआधीच जागे झाले पाहीजे… लक्षात ठेवा जेव्हा झाडाला बहर असतो तेव्हाच आणि फक्त तेव्हाच ते सावली देऊ शकते… पानगळ झाल्यावर शुष्क फांद्यांनी धड स्वतःलाही झाकू शकत नाही… आपण या झाडापेक्षा विचित्र परिस्थितीत आहोत कारण आपल्या आयुष्यात तारुण्याचा बहर एकदा आणि एकदाच येतो पुन्हा नाही! झाडाला पुढच्या  ऋतुमध्ये पुन्हा ती संधी मिळते आपल्याला नाही! त्यामुळेच समाजाप्रती सदविचाराने पेटून उठायचे तर तारुण्यात नंतर नाही! एखादे आदर्श काम उभे करायचे तर आता तारुण्यात, नंतर नाही! झोपेत आहोत हे मान्य करायचे व सळसळून उठायचे तर आत्ता ! नंतर नाही!

हे सारे विचार मी का लिहीतोय किंवा मी कोणी मोठा साधुसंत आहे असे बिल्कुल काही नाही… अगदी क्षुल्लक व कफल्लकपणे जगणारा, सर्वसामान्य रहाटगाड्यात पिसलेला व संसाराच्या दावणीला बांधलेला आणखी एक तरुणच आहे… हे विचार स्फुरणे माझ्याकडे नक्कीच नाही.. यावर माझा मालकी हक्क मुळीच नाही… हे त्वेषाने अंतरंगातून उमटणारे ध्वनीसंवाद शब्दांमार्फत पोहचविण्याचे काम मी करत आहे.. या विचारांच्या या प्रक्रियेमध्ये माझे स्वतःचेही शुद्धीकरण होत आहे हेदेखील मान्य करावेच लागेल! जन्म फक्त जगण्यासाठी कसा काय असू शकेल या जगण्याच्या नाण्याला दुसरी बाजू आहे व ती जास्त सच्ची आहे यावर जास्त विश्वास बसत आहे… वा या जगण्याच्या दुसर्‍या बाजूला अहंकाररहीत असणार्‍या जगाला तिरस्काराची धार नाही, अहंमतेचा अविष्कार नाही, भ्रामक श्रीमंतीचा दिखाऊ महाली साज नाही.. इथे आहे तो जंगलाच्या मध्यभागी एखाद्या खळखळ वाहणार्‍या झर्‍याच्या बाजुच्या निरवतेत बांबुनी बनवलेल्या शेणाने लिपलेल्या ऋषीमुनींच्या आश्रमातील निर्मळ शांतता! वेगाचा विषारी नाद नाही तर वेगाचा ध्यास आहे, कुरघोडी करण्याचा लपंडाव नाही तर कर्तृत्वाचा गौरव करणारा, पुढील विजयासाठी अभीष्ट चिंतणारा सहयोग्यांचा संगवाद आहे! फळाची अपेक्षा करुन फळापर्यंत पोहचण्यासाठी केलेल्या कष्टांना, निष्ठेला फळापेक्षा जास्त पूजणारा समाज आहे… आणि हे वेगळे जग अजून कुठे नाही तर आपल्यामध्येच आहे फक्त आपण त्यापासून अनभिज्ञ असतो व त्याला सरळपणे नाकारत असतो.. कधीतरी या जगाची ओढ मनात जागवून बघण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहीजे… मी कुणाला हे सुचविणारा कोणी नाही… शेवटी कृष्णाने बासरी वाजवली तरच रान मोहरुन जाते, गोपिकांच्या मनाची चलबिचल होते.. आपणही या बासरीप्रमाणे आहोत अन आपल्याच अंतरातील त्या कृष्णाचा शोध मात्र आपण घ्यायला हवा… कृष्णाला बासरी कोणती, कसली याने फरक नाही पडत.. बासरी कशीही असली तरी त्यात भावविभोर सुरांची पखरण करणारा साक्षात विश्वविधाता परमेश्वरच आहे हे विसरता कामा नये!

गेले तीन दिवस काय होते व कसे होते याचा आराखडा मांडणे म्हणजे पाण्यावर श्लोक लिहीण्यासारखे होईल.. कधी कधी आपल्यात आलेली एखादी स्थिती आपल्यालाही नवीन असते.. आपणामध्ये असलेले वावटळ आपल्याच विचारांच्या चिंध्या करुन आपल्यासमोर उधळवत असते अन आपण विषण्ण भावनेने मूक प्रेक्षक बनून राहतो… पण कधी आपल्यातील चांगले विचार आपल्याच तुटक्या मुटक्या विचारांच्या वाळुतून एखादी अफलातून रांगोळी सजवतात की आपण थक्क होऊन, मोहरुन जाण्यापलिकडे काहीच करु शकत नाही… एखाद्या अनोळखी भुयारात जायचे असेल व पुढे मार्ग कुठे निघणार व परत आकाश कधी दिसणार हे माहीत नसेल तर काय अवस्था होते.. पण त्याचवेळेला जर कुणी नकाशा घेऊन पुढे दिवा घेऊन आपल्याला वाट दाखवणारा वाटाड्या अंधाराच्या गर्भातून जन्माला आला तर कसे वाटेल ना… असेच काहीसे अनुभव जाणीवेच्या आभाळातून झिरपत आहे… मुसळधार पावसालाही एक वेगळा मायेचा ओलावा होता… भिजवण्यापेक्षाही गोंजरण्याचा त्या पावसाचा कयास होता असे वाटून गेले… एखाद्या खेडेगावात डोंगरावरुन वा माचावरुन ‘ओ’ देणे जसे असते व त्या ओ ला गावातून जसे समर्पक उत्तर जाते त्याचप्रमाणे आम्ही अनुभूतीच्या माचावरुन त्या परब्रह्माला ‘ओ’ दिला व त्यानेदेखील दरवेळेला त्या ओ मध्ये त्याच्या कृपाशीर्वादाचा ओ मिसळला… या अशा अनुभवांच्या गर्दीमध्ये भौतिक जगामध्ये कोसळणार्‍या वा येणार्‍या अडथळ्यांकडे लक्षा देणे होतच नाही.. कारण अडथळा हा पार करण्यासाठीच असतो व त्यासाठीच तो आपल्या वाटेवर पेरलेला असतो यावर पूर्ण विश्वास बसला आहे हे नक्की!

रस्त्यावर कुठेतरी अकस्मात फुलणार्‍या फुलाचे भविष्य जेवढे अनाकलनीय असते तेवढेच मनात उठणार्‍या वेगवेगळ्या भावतरंगांच्या सुक्ष्म अस्तित्वाचा पुढील अंदाज वर्तवणे अनाकलनीय असते…  एखाद्या लाटेवर स्वार असणे पुर्ण मान्य आहे पण ती लाट ओसरली तर काय करायचे हे आधी ठरवायला नको का? उडणार्‍या पाखरालाही शेवटी जमिनीवरच घरटे बांधावे लागते… एखाद्या धुंदीत हरवून जाणे सगळ्यांना माहीत असते.. कुणाला यशाची, कुणाला दुःखाची, कुणाला व्यसनाची तर कुणाला आणखी कशा-कशाची धुंदी येऊन जगाचा विसर पडतो हे ज्याचे त्यालाच ठाऊक… तरुणपणाचे उसळते तारुण्य नुसतेच निष्क्रीयतेच्या डोंगरावर अभिषेक करवुन घालायचे की आयुष्यात काहीतरी करायचे हेच कळत नाही कित्येकांना.. विज्ञानानुसार एक बिंदू दुसर्‍या बिंदुकडे हजारवेळा जाऊन जर पुर्ववर त्याच ठिकाणी येऊन थांबला तर त्याचे विस्थापन ‘शुन्य’ असते! आपल्यापैकी कित्येकांचे हेच नाही का होत… ‘मी, घर, नोकरी, मुले-बाळे अन मी’ एवढाच आयुष्याचा फेरफटका होतो व शेवटी वृद्धपणी ‘मी’वर येऊन थांबणे होते.. म्हणजेच काय तर विस्थापन ‘शून्य’! जोपर्यंत विचारांचे वारू चौफेर फिरत नाहीत, कष्टाचे नगारे वाजत नाहीत, निश्चयाचा शंख निनादत नाही, सदविचार-कुविचार यांचे घमासान होत नाही, स्वतःमधुन ‘सृजना’ची निर्मिती होत नाही, जगामध्ये विजयी पताका घेऊन फिरण्याआधी जोपर्यंत आपल्या आतमधील चेअतनाशक्तीच्या स्त्रोताची ओळख होत नाही तोपर्यंत सारे व्यर्थ! तरुणपिढीतल्या लोकांना हे सारे थोतांड वाटते अन बरोबर आहे कारण ज्याची ओळखच नाही त्याबद्दल अजून आपण बोलणार तरी काय? दृष्टीकोनामध्ये आलेला हा फरक आता आपल्या प्राचीन संस्कृतीच्या मुळावर उठला आहे.. काही माहीती करुन घेण्याआधीच कुपमंडुकता डोके वर काढते.. आता तरी आपण मान्य करायला हवेच की ज्या गोष्टी आपल्या माहित नाहीत त्या जगामध्ये होत्या, आहेत अन असतात! अशक्यतेच्या डोंगराला पाहुन घाबरण्यापेक्षा त्याला फोडायला तयार व्हायला हवे, डोंगरालाही फोडुन बोगदा करता येतो, किंवा त्याला वळसा घालून पुढे जाता येते हे अंगी बाणले पाहीजे!

लाकडाची मोळी कितीही करकचुन बांधली वा कितीही दोन फळकटं एकत्र चिकटवली तरीसुद्धा झाडावर असताना त्या लाकडांमधील ऋणानुबंध आपण पुन्हा नाही निर्माण करु शकत… एकाच झाडावर दोन भिन्न भिन्न जागी येणार्‍या व एकमेकांबरोबर नसलेल्या दोन फळांमध्ये असणारे नाते परडीमध्ये वा केलेल्या सरबतामध्ये पुन्हा तग नाही धरु शकत… बस्स, असेच काहीसे आपल्याबाबतीत आहे जोपर्यंत आपण काही करु शकतो किंवा काही करण्यासारखे आहोत तेव्हा संधी वाया दवडण्यासारखे दुर्दैव नाही.. जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडण्यास आपण सज्ज झालेच पाहीजे.. आपल्या सदविचारांची मोळी बांधण्याआधी वा आपल्या सदविचारांच्या फळांचा सरबत होण्याआधीच जागे झाले पाहीजे… लक्षात ठेवा जेव्हा झाडाला बहर असतो तेव्हाच आणि फक्त तेव्हाच ते सावली देऊ शकते… पानगळ झाल्यावर शुष्क फांद्यांनी धड स्वतःलाही झाकू शकत नाही… आपण या झाडापेक्षा विचित्र परीस्थितीत आहोत कारण आपल्या आयुष्यात तारुण्याचा बहर एकदा आणि एकदाच येतो पुन्हा नाही! झाडाला पुढच्या  ऋतुमध्ये पुन्ह ती संधी मिळते आपल्याला नाही! त्यामुळेच समाजाप्रती सदविचाराने पेटुन उठायचे तर तारुण्यात नंतर नाही! एखादे आदर्श काम उभे करायचे तर आता तारुण्यात नंतर नाही! झ्पेत आहोत हे मान्य करायचे व सळसळुन उठायचे तर आत्ता नंतर नाही!

हे सारे विचार मी का लिहीतोय किंवा मी कोणी मोठा साधुसंत आहे असे बिल्कुल काही नाही… अगदी क्षुल्लक व कफल्लकपणे जगणारा, सर्वसामान्य रहाटगाड्यात पिसलेला व संसाराच्या दावणीला बांधलेला आणखी एक तरुणच आहे… हे विचार स्फुरणे माझ्याकडे नक्कीच नाही.. यावर माझा मालकी हक्क मुळीच नाही… हे त्वेषाने अंतरंगातुन उमटणारे ध्वनीसंवाद शब्दांमार्फत पोहचविण्याचे काम मी करत आहे.. या विचारांच्या या प्रक्रीयेमध्ये माझे स्वतःचेही शुद्धीकरण होत आहे हेदेखील मान्य करावेच लागेल! जन्म फक्त जगण्यासाठी कसा काय असू शकेल या जगण्याच्या नाण्याला दुसरी बाजू आहे व ती जास्त सच्ची आहे यावर जास्त विश्वास बसत आहे… वा या जगण्याच्या दुसर्‍या बाजूला अहंकाररहीत असणार्‍या जगाला तिरस्काराची धार नाही, अहंमतेचा अविष्कार नाही, भ्रामक श्रीमंतीचा दिखाऊ महाली साज नाही.. इथे आहे तो जंगलाच्या मध्यभागी एखाद्या खळखळ वाहणार्‍या झर्‍याच्या बाजुच्या निरवतेत बांबुनी बनवलेल्या शेणाने लिपलेल्या ऋषीमुनींच्या आश्रमातील निर्मळ शांतता! वेगाचा विषारी नाद नाही तर वेगाचा ध्यास आहे, कुरघोडी करण्याचा लपंडाव नाही तर कर्तृत्वाचा गौरव करणारा, पुढील विजयासाठी अभीष्ट चिंतनारा सहयोग्यांचा संगवाद आहे! फळाची अपेक्षा करुन फळापर्यंत पोहचण्यासाठी केलेल्या कष्टांना, निष्ठेला फळापेक्षा जास्त पुजणारा समाज आहे… आणि हे वेगळे जग अजुन कुठे नाही तर आपल्यामध्येच आहे फक्त आपण त्यापासुन अनभिज्ञ असतो व त्याला सरळपणे नाकारत असतो.. कधीतरी या जगाची ओढ मनात जागवून बघण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला पाहीजे… मी कुणाला हे सुचविणारा कोणी नाही… शेवटी कृष्णाने बासरी वाजवली तरच रान मोहरुन जाते, गोपिकांच्या मनाची चलबिचल होते.. आपणही या बासरीप्रमाणे आहोत अन आपल्याच अंतरातील त्या कृष्णाचा शोध मात्र आपण घ्यायला हवा… कृष्णाला बासरी कोणती, कसली याने फरक नाही पडत.. बासरी कशीही असली तरी त्यात भावविभोर सुरांची पखरण करणारा साक्षात विश्वविधाता परमेश्वरच आहे हे विसरता कामा नये!

गेले तीन दिवस काय होते व कसे होते याचा आराखडा मांडणे म्हणजे पाण्यावर श्लोक लिहीण्यासारखे होईल.. कधी कधी आपल्यात आलेली एखादी स्थिती आपल्यालाही नविन असते.. आपणामध्ये असलेले वावटळ आपल्याच विचारांच्या चिंध्या करुन आपल्यासमोर उधळवत असते अन आपण विषन्न भावनेने मुक प्रेक्षक बनुन राहतो… पण कधी आपल्यातील चांगले विचार आपल्याच तुटक्या मुटक्या विचारांच्या वाळुतुन एखादी अफलातुन रांगोळी सजवतात की आपण थक्क होऊन, मोहरुन जाण्यापलिकडे काहीच करु शकत नाही… एखाद्या अनोळखी भुयारात जायचे असेल व पुढे मार्ग कुठे निघणार व परत आकाश कधी दिसणार हे माहीत नसेल तर काय अवस्था होते.. पण त्याचवेळेला जर कुणी नकाशा घेऊन पुढे दिवा घेऊन आपल्याला वाट दाखवणारा वाटाड्या अंधाराच्या गर्भातुन जन्माला आला तर कसे वाटेल ना… असेच काहीसे अनुभव जाणिवेच्या आभाळातुन झिरपत आहे… मुसळधार पावसालाही एक वेगळा मायेचा ओलावा होता… भिजवण्यापेक्षाही गोंजरण्याचा त्या पावसाचा कयास होता असे वाटुन गेले… एखाद्या खेडेगावात डोंगरावरुन वा माचावरुन ‘ओ’ देणे जसे असते व त्या ओ ला गावातुन जसे समर्पक उत्तर जाते त्याचप्रमाणे आम्ही अनुभुतीच्या माचावरुन त्या परब्रम्हाला ‘ओ’ दिला व त्यानेदेखील दरवेळेला त्या ओ मध्ये त्याच्या कृपाशीर्वादाचा ओ मिसळला… या अशा अनुभवांच्या गर्दीमध्ये भौतिक जगामध्ये कोसळणार्‍या वा येणार्‍या अडथळ्यांकडे लक्षा देणे होतच नाही.. कारण अडथळा हा पार करण्यासाठीच असतो व त्यासाठीच तो आपल्या वाटेवर पेरलेला असतो यावर पुर्ण विश्वास बसला आहे हे नक्की!

यावर आपले मत नोंदवा